टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश नारायण राणे पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या सुटकेबद्दल संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची बातमी शेयर करत ट्विट केले की ” संज्या ती मांजर आहे जी डोळे बंद करून दूध पिते पण तिला वाटतं मी जगाला दूध पिताना दिसत नाही. आत टाकायचा यांनीच आणि सुटला म्हणून पेढे वाटायचे पण यांनीच. असे म्हणत टीका केली आहे.
तर झाले असे की चुकीची बातमी दाखविल्याचा आरोप करत ए बी पी माझा चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.कारण एबीपी माझाच्या ‘ त्या ‘ बातमीमुळे बांद्रा मुंबई येथील रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमली होती.आणि त्या गर्दीमुळे जमावबंदीच्या आदेशाचे तीन – तेरा वाजले होते.त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ चुकीची माहिती पसरवणाऱ्या वर कारवाई करू असा इशारा दिला होता.आणि त्यातूनच पत्रकार कुलकर्णी यांना अटक झाली होती.
दरम्यान,पत्रकार कुलकर्णी यांना गोवण्यात येत आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून केला गेला होता. करोना आटोक्यात आणण्यात राज्य शासनाला सततचे येणारे अपयश झाकण्या करता लोकांचे लक्ष इतरत्र भटकावण्याचे हे उद्योग आहेत असे म्हटले गेले होते.आणि याच मुद्द्याला धरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.उद्धव ठाकरे सरकारचे अपयश झाकण्यासाठी पत्रकार कुलकर्णी यांच्या अटकेच्या हा सगळा खटाटोप रचला गेला असल्याचे सांगितले जात आहे.म्हणून अटक पण यांनीच करायची आणि सुटका करून पण यांनीच पेढे वाटायचे असेही राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

