🕒 1 min read
मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
आज या मुद्द्यावरून या शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. राज्यपाल केवळ फाईलींवर बसून राहत आहेत का? असं सामनातून टीका करताना म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातून ही टीका झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगताना पहिला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. तसेच संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील शिवसेनेला टोला लगावला आहे. साधु-संतांच्या पदस्पर्शाने राजभवन पवित्र आहे आणि राज्यपाल हे कर्मयोगी ‘धर्म रक्षक’ आहेत त्यामुळे तिथे कोणत्याही यज्ञांची गरज नाही. मात्र वर्षा निवासस्थानाला नक्कीच भुताटकी ने पछाडले असावे म्हणुनच तर मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाहीत आणि तिथे रात्री झोपायलाही घाबरतात असा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा; भाजपची अनोखी ऑफर
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयची ‘ही’ मोठी मदत
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

