🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने केलेल्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राजकीय फायद्यासाठी तुम्ही सेंट्रल एजन्सीचा गैरवापर करायचा, चुकीचे आरोप करायचे, कॅबिनेट मिनिस्टरला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलने देखील करायची. त्यामुळे आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देखील अधिकार आहेत की कोणाचा राजीनामा मंजूर करायचा आणि कुणाचा राजीनामा फेटाळायचा.
आदित्य ठाकरे यांना उत्तर प्रदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाला. तुमची लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात त्यामुळे गंगा जास्त मैली झालेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आमचे गळे आवळण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
किरीट सोमय्यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव ठाकरे व सोनिया गांधी या दोघांसाठी आर्थिक…’
“रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे”, आशिष शेलारांचे मोठे वक्तव्य
VIDEO: विकेट घेतल्यानंतर सर जडेजाने केले “पुष्पाराज” स्टाईलने सेलिब्रेट
कर्माची परतफेड करावीच लागते; उदयनराजेंचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला
Russia-Ukraine War : “प्रिय पुतिन, मी तुझी आई असती तर…”; अभिनेत्रीची अजब इच्छा


