Share

#coronavirus : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनीटायझर रूम

Published On: 

🕒 1 min read

वेळू : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

दिलासादायक बातमी म्हणजे अजूनतरी ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला नसल्याने स्थानिक प्रशासनकडून गावातील नागरिकांची दखल घेतली जात आहे. यामुळे वेळू (ता. भोर) ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या मुख्य रस्त्यावर सॅनिटायझर रूम तयार करण्यात आली आहे.

गावातील किराणा दुकान, भाजी दुकाने (दि.२०) एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे गावातील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीकरीता बाहेर पडतील त्या लोकांनी या रूम मध्ये कमीत-कमी २० सेंकद थांबून हात वर करून गोल फिरायचे आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भोर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे साहेब, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदिप भोंगे यांनी वेळू गावाला भेट दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!