Share

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी सफाई कामगाराने दोन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला

Published On: 

नवी दिल्ली : संपूर्ण कोरोनाला हरवण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच भारतामध्येही राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर सहाय्यता निधी गोळा करण्यासाठी सामान्यांनी पुढे यावे असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर तेलंगणामधील एका सफाई कर्मचाऱ्याने करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पैसे देण्यासंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत या सफाई कामगाराने आपला दोन महिन्याचा पगार म्हणजेच १७ हजार रुपये सहाय्यता निधीला दिले आहेत.

‘माझ्या राज्यातील सामान्य नागरीक हेच खरे हिरो आहेत. आज बोंथा साई कुमार या उत्तनूरमधील सफाई कामगाराने त्याच्या दोन महिन्याचा पगार १७ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले,’ असं तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री के.टी रामा राव यांनी ट्विटवरुन या कर्मचाऱ्याचे कौतुक केलं आहे.

दरम्यान, देशामधील अनेक ठिकाणी स्थलांतरीत कामगार तसेच गरीब जनतेला लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणाऱ्यांना सेवाभावी संस्था तसेच राज्य सरकारांच्या माध्यमातून मदत केली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!