नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी किसान रेल्वे महत्त्वपूर्ण ठरत असून शेतीसंबंधी अर्थकारणात या रेल्वेमुळे मोठा बदल होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला ते पश्चिम बंगालमधल्या शालिमार दरम्यान किसान रेल्वेच्या 100 व्या फेरीला काल पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला; त्यावेळी ते बोलत होते.
किसान रेल सेवा देश के किसानों की आमदनी बढ़ाने की दिशा में एक बहुत बड़ा कदम है। इससे देश के छोटे और सीमांत किसानों को बहुत बड़ी शक्ति मिली है। #100thKisanRail pic.twitter.com/DAhM0ZM0z7
— Narendra Modi (@narendramodi) December 28, 2020
किसान रेल्वेमुळे देशातील शीतगृह पुरवठा साखळी बळकट होईल, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की यातून शेतकऱ्यांचं हित आणि त्यांचं सशक्तीकरण करण्याची सरकारची कटिबद्धता यातून दिसून येते. एक भारत, एक बाजारपेठ हा निर्धार पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे समर्पित असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यावेळी बोलताना म्हणाले.
किसान रेल्वे आता पर्यंत 14 राज्यांमध्ये धावल्या असून भविष्यात संपूर्ण देश या रेल्वेनं जोडण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. पहिली किसान रेल यावर्षी 7 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती; तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ती आठवड्यातून तीन दिवस सोडली जाते.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- ‘संजय राऊतांनी कंपाउंडरऐवजी डॉक्टरांकडून औषधे घेऊन मनस्थिती ठीक करावी’
- ‘कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ?’
- वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

