टीम महाराष्ट्र देशा: नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरवावरून शुक्रवारी औरंगाबाद महापालिकेत जोरदार राडा झाला आहे, पालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले, पोलिसांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढले, त्यामुळे वातावरण आणखीनच गंभीर बनले होते. दरम्यान, काळाच्या राड्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून एमआयएमवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल. असं सामनातून सांगण्यात आलं आहे.
जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली ३० वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसल्याचं सामनात म्हंटले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले. सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

