औरंगाबाद : कन्नड येथील मौजे जैतखेडा येथील शेतकरी भरतसिंग कप्पुसिंग डेडवाल यांच्या मालकीच्या गट क्रमांक १९२ मध्ये विहीरीत चार नीलगाय पडल्याची स्थानिक वनकर्मचारी यांना माहिती मिळाली.
त्यानंतर तात्काळ वनपरिमंडळ अधिकारी चिकलठाण एस.पी. कादी, पशुवैद्यकीय अधिकारी विजय इटवले, शीघ्र कृती दल औरंगाबादचे सदस्य एम. ए.शेख ,अमोल वाघमारे,एस. एम. माळी, ए. डी.आव्हाड, स्थानिक वनरक्षक सुभाष भोजने, राम जाधव, सचिन काकुळते, यांच्यासह यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तीन नीलगाईंना उपलब्ध साधन सामग्री वापरून मोठ्या शिताफीने विहिरीतुन बाहेर काढून सुखरुप सुटका केली.
परंतु एक नीलगाय पिलू दुर्दैवाने टीम पोहोचण्याआधीच दगावलेले होते. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थित मृत नीलगाय पिलू चे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले व रितसर कारवाई केली. यावेळी वनसेवक रतन मगर, बनकर, जाधव, निकाळजे तसेच
स्थानिक इसाक पठाण, सतीश डेडवाल, गणेश डेडवाल, सतीश खिल्लारे, आदींचे सहकार्य लाभले.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

