Share

दलालांसाठी बांडगुळ म्हणून काम करणारे लोक या कायद्याला विरोध करत आहेत – खोत

Published On: 

नाशिक : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ८ दिवस पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अजूनही ठाण मांडून आहेत.

तर, आता महाराष्ट्रात देखील या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यांवर उतरताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभरात आत्मक्लेश आंदोलन केलं गेलं. यावेळी अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. कोल्हापुरात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हे देखिलसहभागी झाले होते. गुरुवारी रात्री सुरु करण्यात आलेलं आंदोलन आज पहाटे ६ पर्यंत करण्यात आलं

रात्रभर आत्मक्लेष जागरण गोंधळ आंदोलन करुन आम्ही संयम आणि शिस्त दाखवून दिली. हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे, असा इशाराच शेट्टींनी यावेळी दिला. तर, ‘शेतकऱ्यांच्या तीव्र भावना राज्य सरकारने केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात,’ अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरस्कार वापसीच सत्र सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांनी ही याचा बोध घेत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे केंद्र सरकारला दाखवून द्यावं, असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे.

मात्र राजू शेट्टींच्या या आंदोलनाचा आणि भूमिकेचा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सामाचात्र घेतला आहे. एकीकडे भाजीपाला नियमनमुक्ती आणि अडत बंदीला पाठिंबा दिला. आता बाजू बदलल्यामुळं विरोध सुरु असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केलीय. कुणी काय भूमिका घ्यावी हा त्याचा प्रश्न आहे. मात्र शरद जोशी यांना अभिप्रेत असलेलं हे कृषी बिल असल्याचं सदाभाऊ म्हणाले. मार्केट कमिटी आणि दलालांसाठी बांडगुळ म्हणून काम करणारे मूठभर लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या ९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र आता सदाभाऊ खोत हे केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. कृषी कायद्याच्या समर्थनात ६ डिसेंबरला शेतकरी एल्गार होणार असल्याची घोषणा खोत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!