सांगली:- दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, कृषी कायद्यावरून देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात नाक खुपसणारे विदेशी कलाकार जगभरात अन्य उलथापालथ घडत असताना काय करत होते? त्यांना आमच्या देशाच्या अंतर्गत विषयात भूमिका मांडण्याची गरज नाही. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एकच षटकार ठोकून त्यांचे तोंड बंद केले आहे. सरकारला कोंडीत पकडू पाहणारे विरोधकही त्याने बेजार झाले आहेत, असे मत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिनच्या ट्विटनंतर उठलेल्या वादळावर व्यक्त केले आहे.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही रेहानाला फटकारून योग्य तेच केले आहे. सचिन आम्ही भारतीय शेतकरी तुझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहोत. कोणी काही ही म्हणू दे, तू असाच या राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत रहा. लतादिदींच्या अजरामर गाण्यांपुढे अशा टिवटिव निष्प्राण होवून पडतील, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी रेहानाला फटकारत सचिनची बाजू घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

