Share

पैशांचा पाऊस : दौंड मतदारसंघात ३० लाख रुपये जप्त

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसह कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

पुणे विभागात असलेल्या पुण्यासह सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त उपस्थित होते.

मागील लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील मतदानाची टक्‍केवारी कमी होती, यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मतदारजागृती मोहीम व्‍यापक करण्‍यात यावी, ‘स्‍वीप’ कार्यक्रमांतर्गत सर्व माध्‍यमांचा वापर करण्‍यात यावा आदी सूचना सिन्हा यांनी केल्या.

निवडणूक काळात गैरमार्गाने आणलेली ३२ लाख रुपयांची रोकड आज दक्षता पथकानं जप्त केली. दौंड मतदारसंघात ३० लाख तर भोसरी मतदारसंघात दोन लाख रुपये जप्त करण्यात आले. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात एकंदर ५५ लाख दहा हजार सहाशे नव्वद रुपये जप्त करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!