🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. रोहित पवार हे या मतदारसंघातील जनतेला कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे पाणी आणायचे आहे, मला आमदार करा असं रोहित पवार म्हणत आहेत परंतु एका पत्राने त्यांची अडचण वाढली आहे.
कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे पाणी आणायचे आहे असा दावा करणाऱ्या रोहित पवारांचे काका अजित पवार यांनी पाटबंधारे मंत्री असताना एक पत्र लिहिले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांना कुकडीचे पाणी कर्जत-जामखेडला देणं शक्य नाही असं म्हटले होते.
एकीकडे रोहित पवार पाणी आणण्याचा दावा करत असताना या पत्रामुळे ते तोंडघशी पडलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या पत्राचा रोहित पवार यांना तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांना पवारांविरुद्ध बोलण्यासाठी नवीन मुद्दा मिळाला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांची लढत ही फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या राम शिंदे यांच्याशी होत आहे. राम शिंदे हे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेडमधून आमदार आहेत. त्यामुळे शिंदे विरुद्ध पवार ही लढाई अत्यंत चुरशीची होत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234231750672384?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183226701859278848?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183225373716180992?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

