🕒 1 min read
मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी सांगली येथे विष्णुदास भावे गौरव पुरस्काराची घोषणा केली.
कवी, लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.२५ हजार रु. रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘तुझं माझं ब्रेक-अप’मधील या मालिकांमधील भूमिका असो किंवा ‘अग्निपथ’ सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका असो, आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मनोरंजन विश्वात उमटवला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182928268355239937?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182919086918864896?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

