Share

इंधन दरवाढीमुळे शेतीची मशागत झाली महाग, नांगरणीचेही वाढले दर

Published On: 

जालना: एकेकाळी ज्याच्याकडे जास्त बैल तो श्रीमंत शेतकरी समजला जायचा. शेतीची अनेक कामे बैलाच्या साहाय्याने व्हायची. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी, अशी सर्व कामे केली जायची. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांच्या मदतीने भरपूर कामे व्हायची, प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवीत आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही असं समीकरण तयार झालेलं होते. मात्र बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले, शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला.

ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचु लागला, अंग मेहनत वाचली, मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला. पेरणी, नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटरी फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले. पण आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना कामांचे दर वाढवावे लागले. डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढवणे गरजेचे होते.

डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. यातून शेती व्यवसाय देखील सुटला नाही. डिझेलचे दर वाढल्याने शेतीच्या मशागतीचे महत्वाचे साधन असणारे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. मागील वर्षी नांगरणी १२०० रुपये प्रति एकर होती ती यावर्षी १६०० रुपये झाली आहे. रोटाव्हेटर मागील वर्षी ११०० रुपयांत होत असे मात्र आता १५०० ते १६०० रुपये मोजावे लागत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!