मुंबई : मुंबईतील दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत आणि वाईन शॉप्स १०.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर उपहारगृह आणि बार्सना रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ विकऐन्डलाच महापालिकेने खवय्यांना ही भेट दिली आहे. मात्र, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यवसायांना पुर्वीचेच नियम लागू राहाणार आहे.
हळूहळू मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. दुकाने सुरुवातीला अटीसापेक्ष मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली.
राज्य सरकारने एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. इक्बालसिंह चहल यांनी राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटेल, रेस्तराँ आदी रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. परिणामी, आता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
- ‘आंदोलकांना अडवायला खिळे ठोकणे हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं’
- जो रूटची द्विशतकी खेळी ; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात
- ‘पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल बोलणार, किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’?
- Rose Day Special : मैत्रिणीला गुलाब द्यायचा आहे तर मग जाणून घ्या प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे महत्त्व


