🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भारतात कोरोनावर उपचार म्हणून लसीकरण सुरु करण्यात आले, परंतु इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला लसींचा पूरवठा करणे लस उत्पादन कंपनीला शक्य नव्हते. त्यामुळे लसीकरणाला काही काळासाठी भारतातील काही भागात थांबवले गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्या कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवला गेला पाहिजे. या दृष्टीकोनातून भारत सरकारकडून एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. यामध्ये रशियाच्या कोरोना लस स्पूटनिकला भारताता वापरता येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि भारतीय औषध निर्माता पॅनासिया बायोटेक यांनी केली आहे.
आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी किरिल्ल डमित्रिव म्हणाले, ‘पॅनासिया बायोटेकबरोबर भारतात उत्पादन सुरू करणे ही देशाला साथीच्या रोगासोबत लढायला मदत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ते एकत्रीत पणे वर्षभरात 10 कोटी डोस तयार करतील. ‘असे ही सांगितले आहे.
दरम्यान, सध्या लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सदाभाऊ खोत यांना धक्का ; जिल्हाध्यक्षांनी केला शिवसेनेत प्रवेश
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

