Share

भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये पूर्ववत होणार, इतर देशांच्या तुलनेने आर्थिक स्थिती बरी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आरबीआय (भारतीय रिझर्व बँक)चे  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्थिक बाबींवर भाष्य केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर RBI लक्ष ठेऊन आहे. येणाऱ्या काळात आर्थिक संकट असले तरी इतर देशांच्या तुलनेने आपली आर्थिक स्थिती ही बरी आहे.

तसेच RBIने वित्तीय संस्थांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून रिव्हर्स रेपो दर 25 बेस पॉइंटने कमी केला आहे. जेणेकरुन यामुळे बँकांची  गुंतवणूक वाढविली जाईल. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर 4% वरुन 3.75% पर्यंत कमी केला. तर  रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, “साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या काळात बँका, वित्तीय संस्थांनी सामान्य कामकाजासाठी विशेष तयारी केली आहे. भारतासाठी आयएमएफच्या जीडीपी वाढीचा अंदाज 1.9 टक्के आहे, जी -20 देशांमधील हा सर्वोच्च आहे. या व्यतिरिक्त  भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये परत जागेवर येईल, असेही दास म्हणाले.

मार्चमध्ये वाहन उत्पादन, विक्रीत घट आणि वीज मागणीतही घट झाली आहे. मार्चमध्ये निर्यातीत 34.6 टक्क्यांनी घट झाली आहे. तर केंद्रीय बँकेच्या टप्प्यांमुळे बँकिंग प्रणालीतील रोख स्थिती सुधारली आहे, ती वाढली आहे. आरबीआय सिस्टममध्ये पुरेशी तरलता राखण्यासाठी, बँक प्रवाह सुलभ करण्यासाठी आणि आर्थिक दबाव कमी करण्यासाठी नवीन उपायांची घोषणा येणाऱ्या काळात केल्या जातील, असेही दास म्हणाले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!