Share

आणखी एका बँकेत घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या घोटाळ्यानंतर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सर्व संचालकांना सहकार विभागानं हटवलं असून बँकेवर प्रशासक नेमला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या बँकेची अनेक चुकीची धोरणं आणि गंभीर अनियमितता दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा परिणाम सहकारी बँकेच्या सुमारे एक लाख ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेचे प्रवर्तक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अनिल शिवाजीराव भोसले आहेत.

सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी 9 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, एप्रिल 2019 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या विशेष तपासणीत बँकेच्या कामकाजात अनेक ‘गंभीर अनियमितता’ उघडकीस आल्या आहेत.

आरबीआयने पुढील आदेश येईपर्यंत बँकेतून पैसे काढणे, ठेवी, कर्ज, गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई केली आहे. आरबीआयने म्हटले होते की, बँकेची आर्थिक परिस्थिती बळकट होईपर्यंत हे निर्बंध लागू केले जातील. या बंदीला चार महिने उलटून गेले तरी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या भविष्याबाबत आरबीआय कोणताही निर्णय घेऊ शकलेला नाही. याच कारणास्तव हजारो खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183314844172161024?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183314522376830981?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!