Share

आर.बी.आय ने जाहीर केली नवीन वर्षातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी !

Published On: 

मुंबई: कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकल्या त्या केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. नुकत्याच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या आल्या होत्या. तर आगामी नवीन वर्षात देखील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहेत.

2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी आहेत. त्या आधीच भारतीय रीझर्व्ह बँकेने आगामी नवीन वर्ष २०२१ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे बँक कर्मचार्यांना या सुट्यांना अनुसरून आपल्या आगामी पर्यटन त्याच बरोबर इतर योजना आखता येणार आहेत.

या यादीनुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे. आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत. पुढील प्रमाणे हि यादी असणार आहे.

जानेवारी 2021- जानेवारी 1, शुक्रवार – नवीन वर्ष, जानेवारी 2, शनिवार – न्यू ईयर हॉलिडे, जानेवारी 9, दुसरा शनिवार, जानेवारी 11, सोमवार – मिशनरी डे, जानेवारी 14, गुरुवार – मकर संक्रांती आणि पोंगल, जानेवारी 15 ला तिरुवल्लुवर डे, काही राज्यांमध्ये सुट्टी, जानेवारी 23, चौथा शनिवार, जानेवारी 26, मंगळवार – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021- फेब्रुवारी 13, दुसरा शनिवार, फेब्रुवारी 16, मंगळवार – वसंत पंचमी,फेब्रुवारी 27, चौथा शनिवार – गुरु रविदास जयंती.

मार्च 2021- मार्च 11, गुरुवार – महाशिवरात्री, मार्च 13, दुसरा शनिवार, मार्च 27, चौथा शनिवार, मार्च 29, सोमवार – होळी.

एप्रिल 2021- एप्रिल 2, शुक्रवार – गुड फ्रायडे, एप्रिल 8, गुरुवार – बुद्धपोर्णिमा, एप्रिल 10, दुसरा शनिवार, एप्रिल 14, गुरुवार – बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, एप्रिल 21, बुधवार – राम नवमी, एप्रिल 24, चौथा शनिवार, एप्रिल 25, रविवार – महावीर जयंती.

मे 2021- मे 1, शनिवार, कामगार दिन, मे 8, दुसरा शनिवार, मे 12, बुधवार – ईद-उल-फितर, मे 22, दुसरा शनिवार.

जून 2021- जून 12, दुसरा शनिवार, जून 26, चौथा शनिवार.

जुलै 2021- जुलै 10, दुसरा शनिवार, जुलै 20, मंगळवार – बकरी ईद, जुलै 24, चौथा शनिवार.

ऑगस्ट 2021- ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम, ऑगस्ट 14, दुसरा शनिवार, ऑगस्ट 15, रविवार – स्वातंत्र्यदिन,ऑगस्ट 22, रविवार – रक्षाबंधन, ऑगस्ट 28, चौथा शनिवार, ऑगस्ट 30, सोमवार – जन्माष्टमी

सप्टेंबर 2021- सप्टेंबर 10, शुक्रवार – गणेश चतुर्थी, सप्टेंबर 11, शनिवार – दुसरा शनिवार,सप्टेंबर 25, शनिवार – चौथा शनिवार.

ऑक्टोबर 2021-ऑक्टोबर 2, शनिवार – गांधी जयंती, ऑक्टोबर 9, दुसरा शनिवार, ऑक्टोबर 13, बुधवार – महाअष्टमी, ऑक्टोबर 14, गुरुवार – महानवमी, ऑक्टोबर 15, शुक्रवार – दसरा, ऑक्टोबर 18, सोमवार – ईद-ए-मिलान, ऑक्टोबर 23, चौथा शनिवार.

नोव्हेंबर 2021- नोव्हेंबर 4, गुरुवार – दिवाळी, नोव्हेंबर 6, शनिवार – भाऊबीज, नोव्हेंबर 13 – दुसरा शनिवार, नोव्हेंबर 15, सोमवार – दिपावली हॉलीडे, नोव्हेंबर 19, शुक्रवार – गुरुनानक जयंती, नोव्हेंबर 27 – चौथा शनिवार.

डिसेंबर 2021- डिसेंबर 11 – दुसरा शनिवार, डिसेंबर 25 – चौथा शनिवार आणि ख्रिसमस

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!