Share

आर्थिक मंदीवर केलेल्या ‘त्या’ विधानावरून रविशंकर प्रसाद यांनी घेतली माघार 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. खासकरून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आहे आहे. सरकार यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आर्थिक मंदीवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी भाष्य केले होते.

रविशंकर प्रसाद यांनी आर्थिक मंदीवर भाष्य करताना ‘२ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे.

यावर भाष्य करताना रविशंकर प्रसाद यांनी ‘आम्हाला चित्रपटसृष्टीचा खूप अभिमान आहे. लाखो लोकांना चित्रपट उद्योग रोजगार देतो. कराच्या रुपाने देखील चित्रपटसृष्टी योगदान देते. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याची मी माहिती दिली. नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्य माणसाची काळजी आहे असं विधान केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘प्रसारमाध्यमांबरोबर साधलेल्या संवादाचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. माझ्या संभाषणातील एका भागाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी संवेदनशील व्यक्ती असल्याचे ते विधान मागे घेतो असं म्हणत त्यांनी त्यांचे वक्तव्य माघारी घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183343438692900864?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183343228751249408?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183342911607279617?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!