मुंबई : आपल्या विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे रंजित चौधरी यांचे अमेरिकेत काल निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. ते अभिनेत्या सोबतच एक उत्तम लेखक व दिग्दर्शक देखील होते.
त्यांनी ४० सिनेमे व अनेक मालिकेमध्ये भूमिका निभावल्या होत्या. खट्टा मिठा, बातो मे, सिपीसीपी मसाला, कामसूत्र यातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. रंजित यांची बहीण पद्मसी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम च्या माध्यमातून त्यांनी रंजित यांच्या निधनाची वार्ता शेअर केला. लॉकडाऊन संपल्यानंतर ५ मे रोजी त्यांची शोकसभा आयोजित केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
८० च्या दशकात ते अमेरिकेत गेले. त्यानंतर ते तिथेच स्थिरावले. अभिनेता म्हणून काम केल्यानंतर ते एक लेखक म्हणून उदयास आले. त्यांनी लिहिलेल्या ‘सैम सेंड मी’ या नाटकात त्यांनी काम देखील केले होते. अनेक बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

