🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.चित्रपट निर्माते अजय कुमार यांनी याबाबत आरोप केला आहे. २०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. पैसे मागितले असता अमीषा पैसे परत देत नसल्याने अजय कुमार यांनी कोर्टात धाव घेतली होती.
२०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. मात्र देसी मॅजिक’ हा चित्रपट पूर्ण होऊ होऊ शकला नाही. त्यानंतर निर्माता अजय कुमारने अमीषाकडे पैशांची मागणी केली. अमीषाने मोठ्या मुश्किलीने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला. त्यामुळे चेक बाउंस प्रकरणी अमीषाविरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आतापर्यंत अमीषा हिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिनं एकदाही याला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोर्टाने तिला अनेक वेळा समन्स पाठवले. पैशांवरून कोर्टात अनेकदा कारवाई करण्यात आली. ३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली अमिषा पटेल हिने अनेक लोकांचे फोटो दाखवून धमकी दिल्याचा आरोपही कुमार यांनी केला आहे.
तिच्याविरोधात या आधीही फसवणूक केल्याचे आरोप झाले आहेत. एका लग्नसमारंभात येऊन डान्स करण्यासाठी तिला ११ लाख रुपये देऊनही ती लग्न समारंभात पोहोचली नाही. तसेच तिनं जे डान्स करण्याचे आश्वासन दिले होते ते पाळले नाही, असा आरोप तिच्यावर आरोप मुरादाबादमधील ड्रीम विजन इवेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या पवन वर्मा यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182960024483577856?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182964519930253312?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

