Share

रामदास कदमांना कोल्हापुरात फिरू देणार नाही; मराठा समाजाचा इशारा

Published On: 

 

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांच्यांवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी टीका केली होती. त्यानंतर कदम यांना धमकी दिल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. रामदास कदम यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलताना आब राखून बोलावे आणि केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. या वादात सकल मराठा समाजाने उडी घेतल्यामुळे हा वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग येथे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जाते, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्यावरून रामदास कदम यांनी कोणाची लाचारी करू नका, असे संभाजी राजे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यामध्ये वाद रंगला होता. यानंतर आता यामध्ये सकाळ मराठा समाजाने उडी घेत कदम यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजी राजे हे याबात बोलताना म्हणले की, रामदास कदम यांना माझ्याविषयी काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही, असे सांगून टीकेकडे दुर्लक्ष केले. तर धमकीबाबत त्यांनी सांगितले की, मी कोणाला काहीही सांगितलेले नाही. माझी तशी संस्कृती नाही. जे झाले ते चुकीचे होते, असे सांगून मोठेपणाही दाखवला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!