Share

राज ठाकरेंच्या सभेला लोक फक्त गर्दी करतात, मतं मात्र युतीला देतात : रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा जोरदार होत आहेत. यावेळी मला सत्ता नको सक्षम विरोधीपक्ष बनवा अशी भूमिका राज ठाकरे यांनी जनतेसमोर मांडली आहे.यावर रिपाई अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंचे भाषण ऐकायला लोकं येतात, पण मतं आम्हालाच देतात, अशी टीका आठवले यांनी केली आहे.

राज ठाकरेंचा करिश्मा मोठ्या सभा, इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असतो. तसेच, मीडियावालेही त्यांच्या सभा लाईव्ह दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यांनी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मला मतदान करण्याचं केलेलं आवाहन योग्य आहे. राज यांचे काही लोक निवडूण आले तर, ते विरोधी पक्षातच बसणार आहेत. पण, विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याएवढं संख्याबळ मनसेकडे असणे अशक्य आहे, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याची मागणी केली. जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होणार नाही तो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182993044036964359?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182991005152239617?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182990478070800385?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!