🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कर्जत जामखेड मतदारसंघात या विधानसभेला हाय व्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे. आज कर्जत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार राम शिंदे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी राम शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली असून आयात उमेदवाराला निर्यात केल्याशिवाय राहणार नाही, असा इरादा बोलून दाखवला.
यावेळी राम शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघात बारामतीतून आयात केलेल्या उमेदवाराला निर्यात केल्याशिवाय राहणार नाही. कर्जत-जामखेडकरांनी चांगल्या चांगल्याना पाणी पाजलं आहे.गेल्या ५ वर्षामध्ये आम्ही कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला आहे. अशावेळी बाहेरुन आयात केलेल्या उमेदवाराच्या घराण्यांनी कर्जत-जामखेडसाठी एकही काम केल्याची इतिहासात नोंद नाही. उलट जी जनता मत देणार नाही त्यांचा ऊस घेणार नसल्याचा दम हे आयात उमेदवार देत आहेत, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.
या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला. मावळच्या जनतेने ज्या प्रमाणे हिंमत दाखवत पार्थचे पार्सल परत पाठवले तशीच हिंमत कर्जत-जामखेडमधील जनता दाखवून देईल आणि रोहित पवारांना माघारी पाठवील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार ही मावळमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील रोहित पवार ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार यांनी गेली काही वर्ष या मतदारसंघात बांधणी केली असून राष्ट्रवादीने पूर्ण ताकद इथं लावली आहे. तर रोहित पवार यांनीही कमीतकमी वेळात जनतेशी चांगलाचं संपर्क वाढवला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182652870606258176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182651811032899586?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182642195213344768?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

