Share

विधानसभेत भाजप शिवसेनेविरोधातच आमची लढाई, राज ठाकरेंची भेटही याच संदर्भात घेतली – राजू शेट्टी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकी बाबत भाष्य केले आहे. विधानसभेसाठी आमची २० ते २५ जागांची तयारी आहे. विधानसभेत आमची लढाई ही केवळ भाजप शिवसेना महायुतीच्या विरोधात आहे. असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे. तसेच, सगळे सोबत आले तर आम्ही विधानसभेसाठी महाआघाडीसोबत जाणार असेही त्यांनी म्हंटले.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे, पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा दौरेही सुरु केले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकाही पक्षांकडून सुरु आहेत. याचदरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकी बाबत भाष्य केले आहे. विधानसभेसाठी आमची २० ते२५ जागांची तयारी असून सगळे सोबत आले तर आम्ही विधानसभेसाठी महाआघाडीसोबत जाणार आहोत. विधानसभेत भाजप शिवसेनेविरोधातच आमची लढाई आहे. असे राजू शेट्टी यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच घेतली असे त्यांनी म्हटले.

याचबरोबर नांदगावमधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने ५५ गायी मृत झाल्या आहेत. त्यामुळे या गायींच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच, सरकारने कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच बांगलादेशसाठी लावलेले निर्यात शुल्क माफ करावे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना या भागात कांदे फेकून मारू असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!