🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच नेते प्रचारात व्यस्त आहेत. परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे मैदानात उतरल्या आहेत. त्या विविध ठिकाणी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
राजश्री मुंडे यांनी शुक्रवारी महिला मेळावा घेतला यावेळी बोलताना त्यांनी एकदा धनंजय मुंडे यांना निवडून द्या, परळीचा चेहरामोहरा बदलू, असं विधान केले आहे. तसेच परळी भयमुक्त करायची आहे, असं पंकजा मुंडे सातत्याने धनंजय मुंडेंना उद्देशून म्हणत असतात. मात्र इतकी गंभीर स्थिती असती तर हजारो महिला या मेळाव्याला आल्या असत्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना राजश्री यांनी धनंजय मुंडे विकासाचा मुद्दा घेऊन लढत आहेत. अठरा पगड जातीसाठी धनंजय मुंडेंनी काम केलं आहे. मला विश्वास आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. धनंजय मुंडे १०० टक्के निवडून येतील. मतदारांना माझं आवाहन आहे, परळीच्या मातीशी इमान राखणाऱ्या, परळीच्या सुख-दु:खात २४ तास धावून, तुमच्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या, तुमच्या भावाच्या आणि मुलाच्या मागे यावेळेस राहा असं आवाहन महिलांना केले.
दरम्यान, परळीमधून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावांमध्ये लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. दोघांच्याही समर्थकांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंकजा यांच्यासाठी प्रीतम मुंडे आणि आई प्रज्ञा मुंडे प्रचाराच्या मैदानात आहेत. तर धनंजय यांच्यासाठी पत्नी राजश्री मुंडे या प्रचार करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182896498758959104?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182888460819918849?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182886993669152768?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

