🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी घाटकोपर येथे विधानसभा निवडणुकीची दुसरी प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता, भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला अशा शब्दात राम कदम यांच्यावर निशाना साधला.
यावेळी बोलताना त्यांनी ‘तुमचा घाटकोपरचा आमदार सांगतो, तुम्हाला मुलगी पसंत पडली, तर मी उचलून घेऊन येईन. तुम्हाला मात्र त्याच काहीही वाटत नाही. त्यानंतर भाजपकडून त्यांना तिकीटही दिलं जात. याचा अर्थ काय, तर आम्ही काहीही करु असं म्हणत राज ठाकरेंनी मुलगी पळवून आणेन हे विधान केल्यानंतर त्यांना बक्षिस म्हणून पुन्हा तिकीट दिलं जात अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी आमदार ‘मुलगी पळवून आणू हे बोलल्यानंतर तुमच्या मनात जी काही आग झाली असेल, ती व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्ष हवा. जर विरोधी पक्ष जगला नाही, तर बहुमताची सरकार तुम्हाला चिरडून टाकेल असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेला विरोधात बसवा याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत हे सांगायचं काम कोणाचे सरकारचे. पण हे तुम्हाला सांगितलं जात नाही, कारण तुम्हाला गृहित धरलं आहे. ही लोक पाच वर्षातून एकदा येतात. तुम्हीही आंधळेपणाने मत देता. आम्ही कोण आमदार, खासदार निवडतो याची आम्हाला कल्पना नाही असंही ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182683722992115712?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182685115052224512?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

