🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भांडूप येथे विधानसभा निवडणुकीची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
‘मुंबईत चौथी भाषा खपवून घेतली जाणार नाही,’ असे ठाकरे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, चौथी भाषा कुणी आणत असेल तर त्यांना बांबूचे फटके दिले जाईल, असे ठाकरे म्हणाले. तसेच ते म्हणाले, मनसे सैनिकांनी छेडलेल्या आंदोलनामुळे राज्यातील 78 टोलनाके बंद झाले.
सरकारने सत्तेत आल्यावर आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करणार असे आश्वासन दिले, मात्र आजही टोल वसूली सुरु आहे, असे म्हणत ठाकरेंनी सरकारला लक्ष केले. दरम्यान, राज ठाकरे यांची शुक्रवारी घाटकोपर येथे विधानसभा निवडणुकीची दुसरी प्रचारसभेदरम्यान राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता, भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला अशा शब्दात राम कदम यांच्यावर निशाना साधला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182903036068286464?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

