🕒 1 min read
Raj Thackeray | मुंबई : आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांची पोस्ट-
आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.
छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?
असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
– राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | लोकांसमोर सरकारची फसवेगिरी उघडी पाडा – जयंत पाटील
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती टिप्स वापरून चेहऱ्यावरील काळे डाग करा दूर
- Bawankule on Ajit Pawar | “…तर तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही” ; बावनकुळे अजित पवारांना असे का म्हणाले?
- Jitendra Awhad | जामीनानंतर आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सगळं ठरलेलं…”
- Health Tips | लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

