🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविषयी एक प्रश्व विचारण्यात आला यावर त्यांनी आपलं उत्तर दिलं आहे.
सद्याच्या परिस्थितीनुसार राज ठाकरेंचा आपण काय विचार करता? असा सवाल केला असता शरद पवार यांनी, ‘निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल मात्र याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरेंबद्दलचा क्रेज गेला आहे, असं मी मानणार नाही,’ असं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यात सहभागी आहे. या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. याच सरकार विरोधात गेल्या वर्षभरात मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील लोकलप्रश्न, मंदिर खुली करण्यासाठीच आंदोलन, नुकतंच गाजलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी राज्यभरात केलेलं आंदोलन असे अनेक आंदोलन राज्य सरकारच्या डोकेदुखीत वाढ करत असतानाच जनसामान्यांमध्ये न्याय कृष्णकुंजवरच मिळतो अशी भावना निर्माण झाली आहे.
खाजगी कोचिंग क्लासेस चालक-मालक, फी-वाढ व ११ वी प्रवेशप्रक्रियांसंदर्भात विद्यार्थी-पालक, डॉक्टर, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. अनेक अडचणी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दूर होत असल्याने न्याय कृष्णकुंजवर मिळतो अशी भावना देखील मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. आता, शरद पवार यांनी देखील राज ठाकरेंच्या करिष्म्याबद्दल केलेलं वक्तव्य देखील महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’
- पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्यापासून कडक संचारबंदी!
- ‘सरकार आजचं दुखणं उद्यावर ढकलत आहे’; एमपीएससी परीक्षांच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

