Share

पुणेकरांनो काळजी घ्या ! आज संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पुण्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आज संध्याकाळीसुद्धा तुम्ही लवकर घरी पोहचा. कारण आजही संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह शहरात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

शहरात आत्ता तुम्हाला आकाश अशंतः ढगाळ दिसत असेल. पण त्याच वेळी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. दुपारपर्यंत ऑक्टोबर हीट वाढेल. त्यामुळे बाष्पिभवनाचा वेगही वाढणार आहे. सध्या हवेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरात संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात आजही ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. शुक्रवारी सकाळी आकाश अंशत: ढगाळ आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पावसाची शक्यता नाही. पण हवेत अजूनही ८० टक्क्यांहून जास्त आद्रता आहे.

तसेच सूर्यप्रकाशामुळे बाष्पिभवनाचा वेग वाढल्याच ते बाष्पही हवेत जमा होईल. त्यामुळे संध्याकाळी शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182546689304842240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182545554070364163?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!