Share

वांद्रे प्रकरणानंतर अटकेत असलेल्या पत्रकार राहुल कुलकर्णी यांना राज्यातील पत्रकारांचा पाठींबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यात मंगळवारी वांद्रे येथे  झालेल्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण आला आहे.

त्यात खोट्या बातमीमुळे नागरिकांचा गैरसमज होऊन ही गर्दी झाली असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे ABP माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल कुलकर्णी यांच्या अटकेनंतर राज्यातील पत्रकारांनी एकत्र येत राहुल कुलकर्णी यांना पाठींबा दर्शवला आहे. तर सबंधित वाहिनीने त्या वृत्ता मागची आपली भूमिका मांडली आहे.

तसेच पत्रकारांनी देखील एकत्र येत राहुल कुलकर्णी यांना पाठींबा दिला आहे. लोकसत्ता, सामना या दैनिकांनीही आपला पाठींबा दर्शवला आहे. राहुल कुलकर्णी यांना आज न्यायालयात दाखल करणार आहेत.

काय होती बातमी ?

मध्यंतरी 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती, की, जर मध्ये 24 तासांचा कालावधी दिला तर अनेक अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरी जाता येईल. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने एक बातमी दिली होती. रेल्वेच्या साऊथ सेंट्रल झोनमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्येही अनेक मजूर अशाच प्रकारे अडकले आहेत. या सर्वांना घरी जाण्यासाठी रेल्वे एक जनसाधारण स्पेशल ट्रेनची व्यवस्था करत आहे. या संदर्भात 13 एप्रिलला साऊथ सेंट्रल झोनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे एक बैठक झाली होती. यामध्ये अशा ट्रेन चालवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारावर ही बातमी होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!