Share

निर्मला सीतारामन यांच्याबाबात केलेली टिपण्णी राहुल गांधीना पडली महागात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबात केलेली टिपण्णी महागात पडली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं आहे’, असं वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

हे विधान गांभीर्याने घेत राहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केल्याचं म्हणत, आयोगानं राहुल यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का, असा सवाल करत, राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारं आणि अपमानजनक असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना नोटीस पाठवून या वक्तव्यामागं त्यांचा काय उद्देश आहे, याचं आयोगानं स्पष्टीकरण मागवलं असल्याचंही शर्मा म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!