🕒 1 min read
औसा: पंतप्रधान मेक इन इंडियाचा मोठा गाजा-वाजा करतात. मेन इन इंडियाची काय हाल झाले आहे. ते पुण्यात जाऊन पहा. किती कंपन्या बंद पडल्या आहेत ते. देशात मेक इन इंडिया नव्हे तर मेक इन चायना सुरु आहे. भारतीय कंपन्या बंद पडताय आणि चायना कंपन्या देशात आल्या असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर केला.
औसा येथे आमदार बसवराज पाटील यांच्यासाठी राहुल गांधी यांची पहिली जाहिर सभा झाली. या सभेच्या सुरुवातीला कसे आहात, रोजगार मिळतोय, बेरोजागारी वाढीय, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाली, शेतकऱ्यांच्या मालला योग्य भाव मिळाला.अच्छे दिन आ गये क्या असे प्रश्न राहुल गांधी यांनी तरुणांईना सांगितले. देशातील सध्यस्थितीवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टिका केली. यासह माध्यमांवरही राहुल गांधी चांगेल टिका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही हे माध्यमे दाखवतात. का सगळा मिडीया मोठ्या उद्योगपतीच्या हाती गेला आहे. त्यामूळे वास्तव स्थिती दाखविणत नसल्याचे सांगितले.
आदानी, अंबानीचसह यासह काही उद्योजकाचे पाच हजार कोटींचे कर्ज माफ केली. यासह सरकारने काही दिवसापुर्वी देशातील श्रीमंत व्यापाऱ्यांचे एक लाख 25 हजार कोटी रूपयांचा टॅक्स माफ केला. या विषयी माध्यमांनी कुठलाच आवाज उठवला नाही. देशातील प्रमुख मुद्दे सोडून नरेंद्र मोदी, अमित शहा, काश्मिर, 370, पाकिस्तान, चायना हे मुद्द सभामध्ये उपस्थित करीत जनतेची दिशाभूल करीत आहे. देशात 2 हजार कारखाने बंद पडले आहे. देशातील तरुणांईला उद्या काय होईल हे माहित नाही. ज्या अर्थव्यवस्थेची आम्ही घडी बसवली होती. ती अर्थव्यवस्था विस्कळीत करण्याचे काम सरकारने केले आहे.
देशाची फसवणुक करणारे निरव मोदी, मोहन चोक्सी यांना निवांत झोप लागते. मात्र आमच्या शेतकऱ्यांना कर्जांच्या देणी पायी झोपच लागत नाही. ते रात्र-रात्र जागतात. असा टोलाही मोदीला लगावला. कॉंग्रेसची विचारधारा महाराष्ट्राचा मनात आहेत. ही विचारधारा कोणीच मोडू शकत नाही असेही राहुल गांधी यांनी सांगितले. सभेला अभूतपुर्व गर्दी होती. यात तरुणांईचा मोठा सहभाग होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183343438692900864?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

