Share

भारताची अर्थव्यवस्था एक माणूस चालवू शकत नाही, रघुराम राजन यांची मोदी सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय अर्थव्यवस्था सध्या खडतर परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण देशावर होत असल्याचं दिसत आहे. मोदी सरकारकडून योग्यवेळी काही ठोस पावलं न उचलल्यामुळे अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे, असे म्हणत RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारने चालवलेल्या आर्थिक धोरणांची निंदा केली आहे. ब्राऊन विश्वविद्यालयातील एका व्याख्यानादरम्यान राजन यांनी भारता समोरच्या आर्थिक आव्हानांवर भाष्य केले.

राजन म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत. तसेच वित्तीय तूट वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागतो, असे राजन म्हणाले.

भारताचा विकासदर २०१६ मध्ये ९ टक्के होता. मात्र आता तो ५. ३ टक्क्यांवर आला आहे. यामुळे भविष्यात देशावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. आज देशात वित्तीय विभाग आणि वीज क्षेत्राला मदतीची आवश्यकता आहे. मात्र याकडे सरकार कडून दुर्लक्ष केले जात आहे, असे राजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182981218121289728?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182980959206948865?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182979721455259649?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!