Share

आंबे वक्तव्यात भिडे गुरुजींवर ठपका ; कायदेशीर कारवाई होणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’ असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं. या प्रकरणी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. पीसीपीएनडीटी या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवले आहे. पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढला आहे. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार आहे. समितीने अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना सादर केला असून, त्यांच्या संमतीनंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होणार आहे.

समितीने भिडे यांना नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी नोटीस स्वीकारली नाही आणि बाजूही मांडली नाही. त्यामुळे प्रसूतिपूर्व लिंग निदानाची जाहिरात करण्यासंदर्भात ते समितीला कलम २२(७)मध्ये दोषी आढळले आहेत. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात वडांगळीकर मठ येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड असून, त्याचे आंबे १८० कुटुंबाना आपण दिले आणि त्यापैकी दीडशे जणांना मुलेच झाली, असा दावा केला होता. याबाबत पुणे येथे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी महापालिकेला कारवाईसाठी कळविले होते. १८ जून रोजी महापालिकेने पोस्टाने भिडे यांना सांगलीच्या पत्त्यावर नोटीस पाठविला होता. परंतु ते पत्र भिडे यांनी न स्वीकारल्याने माघारी आले होते. भिडे यांचा खुलासा प्राप्त न झाल्याने अखेरीस समितीच्या बैठकीत यावर पुढील भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!