पुणे : राज्यातल्या 288 मतदारसंघांपैकी 184 मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीनं निर्णायक आघाडी घेतली आहे. महाआघाडी 87 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. इतर उमेदवार जागांवर आघाडीवर आहेत. भाजप 111 जागांवर तर शिवसेना 73 जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी कॉंग्रेस 50 तर कॉंग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.
चिंचवड मतदार संघात पाचव्या फेरीअखेर लक्ष्मण जगताप सुमारे साडे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसचे एकमेव आमदार असलेल्या भोरमध्ये मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर शिवसेनेचे कुलदीप कोंडे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यापेक्षा सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मावळमध्ये सातव्या फेरीअखेर राज्यमंत्री बाळा भेगडे आपले प्रतिस्पर्धी सुनील शेळके यांच्यापेक्षा सुमारे 27 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. पुण्याच्या छावणी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली होती. काही इ व्ही एम मशीनसील नसल्याने कॉंग्रेसने आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली होती. पिंपरीत चौथ्याफेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर, जुन्नर मतदारसंघा मध्ये सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे अतुलबेनके सुमारे चार हजार मतांनी पुढे आहेत.
बारामतीमध्ये मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून अजित पवार सुमारे 57 हजार मतांनी आघाडीवर आहेत. जुन्नर मतदारसंघांमध्ये चौथ्या फेरी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अतुल बेनके सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
हडपसरमध्ये नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचेचचेतन तुपे पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत. पिंपरीत चौथ्या फेरीअखेर गौतम चाबुकस्वार साडेचार हजार मतांनी आघाडीवर आहेत.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187253171833327616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187252970187935745?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

