🕒 1 min read
मुंबई : आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि काही क्रिकेट संघ आणि खेळाडूंना मोठ मोठे प्रायोजक आणि ब्रॉडकास्ट करारातून कोटींच्या कोटी पैसे मिळतात. तर दुसऱ्या बाजूला असेही क्रिकेटपटू आहेत की त्यांना सध्या मूलभूत गोष्टी सुद्धा मिळत नाहीत. अशाच प्रकारची गोष्ट झिम्बाब्वे संघासोबत घडली होती.
झिम्बाब्वे संघाचा खेळाडू रायन बर्लने त्याच्या संघाला कोणी प्रायोजक मीळेल का असा प्रश्न करत त्याच्या फाटलेल्या बुटाचा फोटो ट्विट केला होता. हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. या फोटोवर प्रतिक्रिया देताना पुमा या जगप्रसिद्ध कंपनीने आपण झिम्बाब्वेची स्पॉन्सरशीप घेणार अशी प्रतिक्रिया दिली. आणि अवघ्या २४ तासाच्या आत पुमा कंपनीने नविन बुटांचा फोटो ट्विट करत ‘रायन आणि त्याच्या सहकाऱ्यासाठी बुट पाठवत आहोत. आशा करतो की या बुटांचा रंग तुमच्या जर्सीसोबत मॅच होईल’
Look what is on its way ????✈️
Thanks @pumacricket https://t.co/d8oqi25X6T
— Ryan Burl (@ryanburl3) May 24, 2021
या ट्विटला रिट्विट करत रायन बर्लने ‘अरे वा! हे तर निघालेही, धन्यवाद पुमा’ असे’ ट्विट केले. याआधी रायनने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये रायनने ‘मला खुप आनंद होत आहे की मी पुमा क्रिकेटच्या संघाचा सदस्य होणार आहे. आणि मागील २४ तासात आमच्या चाहत्यानी जी मदत केली त्यामुळे हे सर्व शक्य झाले. खुप खुप धन्यवाद पुमा’ असे ट्विट केले होते. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले की झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लवकरच पुमाकडून नवीन बुटांचे जोड मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रिकी पॉण्टिंगच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर आता पृथ्वी शॉचं प्रत्युत्तर, म्हणाला…
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

