Share

14 ऑक्टोबरला महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान मोदी 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रचाराची पहिली सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मोदी राज्यात एकूण 9 सभा घेणार असून या सभांमधून सरकारची ध्येयधोरण सांगणार आहेत.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे राज्यावर चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप सेना युतीचं पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास भाजप श्रेष्ठींना वाटत आहे. त्यामुळे मोदी उशिराने प्रचारात भाग घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

19 ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रचाराची सांगता केली जाणार आहे त्यामुळे त्यापूर्वी 4 दिवस मोदी राज्यभरात प्रचार करणार आहेत. तसेच भाजपाचे अन्य नेते पीयुष गोयल, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नक्वी, योगी आदित्यनाथ आणि इतर नेतेही राज्यभरात प्रचारासाठी येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181547001541869568?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181545201522761728?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181544997486678016?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!