🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. देशावरील कोरोना संकट गडद झाले असून कोरोनाशी लढा तीव्र झाला आहे देशात करोनाचं इतकं मोठं संकट असताना दुसऱ्या बाजूला राजकारण देखील जोरात सुरूच आहे. यातच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर एका टूलकिचा हवाला देत जोरदार हल्लाबोल केला होता.
याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने कॉंग्रेसच्या कथित टूलकिट प्रकरणात दिल्लीतील लाडोसराय येथील ट्विटर इंडियाच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला नोटीस पाठवली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की तक्रारीवरून हा तपास सुरु केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलेल्या एका ‘टूलकिट’संबंधी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या ट्विटवर कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने या ट्वीटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ श्रेणीमध्ये टाकलं होतं.
The Delhi police team went to Twitter office to serve a notice to Twitter, as a part of routine process. This was necessitated as it was to ascertain who the right person was to serve a notice, as replies by Twitter India MD had been very ambiguous: Sources
— ANI (@ANI) May 24, 2021
भाजपाच्या नेत्यांकडून हे टूलकिट सोशल मीडियावर शेअर करून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. मात्र, हे टूलकिट पूर्णपणे बनावट असून काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं म्हणत राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांनी भाजपावर सडकून टीका केली.
दरम्यान, कोरोना संकटात काँग्रेस पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी ‘टूलकिट’चा वापर करत असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र भाजपचा आरोप फेटाळून काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र जिंकणार ; आज तब्बल ४२,३२० रुग्ण कोरोनामुक्त
- राज्य कसं पेटून उठेल याकडं भाजपचं लक्ष – अशोक चव्हाण
- …अन् मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मेटेंनी केलं अजितदादांच कौतुक !
- …हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंच पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
- ‘फडणवीसांनी आरक्षणासाठी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

