🕒 1 min read
भिगवण : कोरोना’ला रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणार्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर दुसरीकडे काही जणांना घरी जाण्यासाठी साधन उपलब्द नसल्यामुळे ते पायी चालत निघाले आहेत. ते चालत असताना कोठे ना कोठे पोलिस प्रशासन यांना सापडले आहेत.
याच प्रमाणे पुणे-सोलापूर आणि बारामती-राशीन या रोडवर सापडलेल्या नागरिकांना पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे. त्यांना काल भिगवण पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार रतिलाल चौधर यांनी त्या नागरिकांना दुपारच्या एक माणुसकीच नातं दाखवून एका किराणा दुकानातून चक्की गुडदानी, पापडी आणि बिस्कीट वाटप केले.
दरम्यान, लॉकडाऊन मुळे राज्यातील अनेक मोलमजुरी करणाऱ्यांवर अशी भिकट वेळ आली आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांजवळ पैसे ही नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं आहे. त्यामुळे असे रस्त्याने पायी जाणाऱ्यावर वाईट वेळ आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

