नवी दिल्ली : नोंदणीकृत ग्राहकांना SMS आणि कॉल केल्यास संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा मोठा निर्णय केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतलाय. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली.
त्या बैठकीत या निर्णयावर एकमत झालंय. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार ग्राहकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार संसाधनांशी संबंधित फसव्या कारवायांची चौकशी करण्यासाठी एजन्सींशी समन्वय साधण्यासाठी “डिजिटल इंटेलिजेंस युनिट” अर्थात DIU नोडल एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.
त्रास देण्याच्या पद्धतीत व्यावसायिक संदेश किंवा कॉल समाविष्ट आहेत. या तसेच दूरसंचार संसाधने आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि सामान्य माणसाला त्याच्या कष्टाच्या पैशांची फसवणूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. अशा प्रकारची कामे रोखण्यासाठी कडक आणि ठोस कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच DND सेवेतील नोंदणीकृत ग्राहकांना मिळत असलेले नोंदणीकृत टेल-मार्केटर म्हणजेच आरटीएम आणि यूटीएम मिळणारे फोन कॉल आणि एसएमएसची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ऑफ महाराष्ट्रसह आणखी चार बँकाचे होणार खासगीकरण
- आता पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एकसमान राहणार
- तीन वाहने फोडून लॅपटॉप लांबवला
- पोलिसांचा नाकर्तेपणा की मंत्र्यांना मुभा, कोरोनाचे नियम फक्त शिवजयंतीलाच का?
- देशभक्त आणि देशद्रोही मधील फरक मोदींना समजत नाही : प्रियांका गांधी


