मुंबई : भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. त्यावर अनिल परब यांनी भाष्य केले आहे.
किरीट सोमय्या हे माझ्यावर माझ्या पक्षावर बेछूट आरोप करत आहेत. कोणतेही पुरावे नसताना खोटी कागदपत्रे दाखवून वेगवेगळे आरोप करत माझी नाहक बदनामी केली आहे. या बदनामी विरोधात मी न्यायलयामध्ये याचिका दाखल करुन 100 कोटींचा दावा केलेला आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना अनिल परब म्हणाल, ‘लोकांनी पालिका शेवसेनेच्या हाती दिली. त्यांचा विश्वास आहे की, शिवसेनेच्या हाती ती सुरक्षित आहे. भविष्यातही मुंबई महापालिका ही शिवसेनेच्याच हातात देतील. आम्ही कामे घेऊन लोकांपर्यंत जाणार’. परब यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला लगावला आहे.
लोकांसमोर खंडणीची की वसुलीची कामे घेऊन जाणार???, असा सवाल करत भातखळकरांनी अनिल परब यांना टोला लगावला आहे.
खंडणीची की वसुलीची???? https://t.co/fnnPXMXYOY
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यपाल सरकारी पैशावर पोसलेले हत्ती, महाराष्ट्राला चूड लावाल तर…; सामनातून राऊतांचा इशारा
- पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळुदे बाबा!; हेमंत ढोमे रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागला
- बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा राजकीय लाभ कोणाला होणार ?
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

