🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसने सत्ताकाळात मुस्लिमांना घाबरवून धर्माचे राजकारण केले. तसेच राष्ट्रवादीने जातीच्या नावाने राजकारण केले असं त्याम्ह्नाल्या आहेत.
पुढे बोलताना त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकला पाहिजे. मोदी सरकारने जम्मू काश्मिरातील कलम ३७० रद्द केले. याचा विरोधक प्रचाराचा मुद्दा करत असल्याचा आरोप पक्षावर होतोय. मात्र तो प्रचाराचा मुद्दा नसून संस्काराचा मुद्दा आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की ‘काँग्रेस राष्ट्रवादीने जातीचं राजकारण केलं. काँग्रेसवाले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीपासून दूर राहा. ही पार्टी अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे. काय झालं पाच वर्षात अल्पसंख्यांकांच्या केसाला तरी धक्का लागला का. या चोरांनी तुमच्या मनात असा भ्रम निर्माण केला. आणि आज राष्ट्रवादीने जातीचा प्रचाक सुरू केला. जात पाहून मतं देत बसलो तर या देशाचं कधीच भलं होणार नाही. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना जातीच्या नावाने डिवचलं त्याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळालं असं या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, यावेळी पंकजा मुंडेंनी ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देशातील गोरगरीब जनतेला मूलभूत सुविधा मिळू शकलेल्या नाहीत. देशात केवळ जाती धर्माचे राजकारण करून सत्तेची पोळी भाजून घेतली अशी टीकाही कॉंग्रेस राष्ट्रवादीवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183319319322562560?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183319066460573697?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183314844172161024?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

