🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले होते. परंतु त्यांच्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला.
भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची आज पिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये आल्या होत्या. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी सभेत गोंधळ घातला. शास्ती कर, हक्कांचे घर हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणी नाही आले, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे म्हणत उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातलाचे पाहायला मिळाला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

