🕒 1 min read
मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
‘कोरोना’च्या संकट काळातच कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचाही फटका बसला. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परजिल्ह्यात अडकले आहेत. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन ट्विटरवरुन केलं आहे.
‘इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!! pic.twitter.com/Is2bTxKnfv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2020


