Share

‘दुसऱ्याच्या सभेत जाऊन गोंधळ घालणे हा राष्ट्रवादीचा जुना धंदा’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले होते. परंतु त्यांच्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची आज पिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये आल्या होत्या. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी सभेत गोंधळ घातला. शास्ती कर, हक्कांचे घर हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणी नाही आले, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे म्हणत उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातलाचे पाहायला मिळाला.यावेळी पंकजा मुंडे यांनी संबंधितांना शांत राहण्याचे आवाहन केले.मात्र त्यांचा गोंधळ सुरुच होता.

या गोंधळावरुन बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, दुसऱ्याच्या सभेत जाऊन गोंधळ घालणे हा राष्ट्रवादीचा जुना धंदा असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं असतात. या वेळेला हे घड्याळ कायमच बंद करून टाकायचं आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच राष्ट्रवादीने सिद्ध केलं की, ते निवडणूक हरले आहेत. ज्या ठिकाणी हजारो लोक बसले आहेत. तिथे एक व्यक्ती उभा करून बोलवण्याचे हे त्यांचे धंदे जुने आहेत. हे जनता खपवून घेणार नाही. परत संबंधित व्यक्ती आणि महिलेला त्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला.

तसेच शांत राहा! लोकशाहीमध्ये या गोष्टी असणे अपेक्षित आहेत असं म्हणत तुम्ही काहीही म्हटलात तरी तुमच्यावर पक्षाची छाप आहे हे विसरू नका. माझ्या सभांमध्ये लोक पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न करता. अश्या प्रकाराला मुंडे साहेबांचे सैनिक घाबरत नाहीत. निवडणुकांपर्यंत आपला संयम सोडायचा नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183335901889323008?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183335974408818688?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!