🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. तसेच राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मुंडे पांढरीपूल येथे जाहीर सभेदरम्यान बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादीचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल ते गोपीनाथ मुंडे आणि त्यांची अवलात म्हणजे मी. त्यामुळे राज्यात येत्या 24 तारखेला रात्रीच्या 12 वाजून 12 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. 370 हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे,’ असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादीवाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे,’ असा विश्वास देखील मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, जो पर्यंत बीड मधील सर्व उमेदवारांच्या डोक्याला गुलाल लागणार नाही, तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला आहे. आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी हा निर्धार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234546059243522?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234231750672384?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

