Share

पाकिस्तानी फलंदाज सामन्यादरम्यान धावला मांजरींमागे; सहकारी म्हणाला, ‘अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीये!’

Published On: 

नवी दिल्ली : करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना खेळाडूंना पाळावे लागत आहे.

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या नियमांत बरेच बदल झाले आहेत आणि आता हळुहळू खेळाडूंनाही या नियमांची सवय झाली आहे, त्यात बायो बबलचीही त्यांना सवय झाली आहे. पण, क्रिकेटच्या मैदानावरील त्यांची धम्माल मस्ती कमी झालेली नाही. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका   यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत विचित्र प्रकार पाहायला मिळाला आणि त्यावरून पाकिस्तान खेळाडूनं आपल्याच सहकाऱ्याला ट्रोल केलं.

रावळपिंडी कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली याला ट्रोल केलं. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना मैदानावर अचानक मांजर आली आणि अझर अली तिच्या मागे धावू लागला. तेव्हा रिझवान म्हणाला, ‘अज्जू भाई टेस्ट नही किया, बबलमध्ये ती नाही आहे.’ त्याचे हे बोलणे यष्टींमधल्या कॅमेरात रिकॉर्ड झाले. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

https://twitter.com/IsmaeelFarrukh/status/1358372229445214208?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!